काँग्रेस शहराध्यक्ष दीपक सलामपुरीया यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, धान्यवाटप
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः काँग्रेसचे शेगाव शहराध्यक्ष दीपक सलामपुरीया यांच्या वाढदिवसानिमित्त 8 मे रोजी शहर शाखेतर्फे दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी ११.३० वाजता रुग्णांना अन्नदान करण्यात आले.
पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील, ज्येष्ठ नेते रामविजय बुरुंगले व अन्य पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. सलामपुरीया यांना शुभेच्छा देण्यात आल्या. प्रभाग क्रमांक 9 मध्ये रामटेकडी परिसरात गरजू महिलांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. सायंकाळी ४.३० वाजता आनंदसागर विसावा येथील Covid -19 सेंटरमधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील, जिल्हा सरचिटणीस कैलासबापू देशमुख, ज्येष्ठ नेते अशोकराव हिंगणे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. असलम खान, गोपाल कलोरे, राजू मूना, विजय वानखडे, एनएसयूआय जिल्हा सचिव संदीप शेजोळे, नगरसेवक शे.नईम शे.जमाल, शहर सरचिटणीस दिलीप पटोकार, प्रकाश शेगोकार, सचिव शेख हाशम भाई, सुभाष हिंगणे, प्रवीण भोपळे, आसिफ खान, भिकू सारवान, समाजसेवक विजय व्यास, संतोष कोकाटे, प्रशांत शेळके, सुनील कराळे, प्रवीण निंबाळकर, पंकज कौलकर, गौरव भारंबे, देविदास सोनोने, संतोष हिंगणे, ज्ञानेश्वर जुमळे, गोविंद देशमुख, छोटू पाटणे, किशोर कोकाटे आदींची उपस्थिती होती.