कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते ‘सोयरिक’चे विमोचन
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मराठा पाटील युवक समितीतर्फे सोयरीक या उपवर युवक- युवती परिचय पुस्तिकेचे प्रकाशन कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.पुस्तिकेचे संपादक रमेश टिकार यांनी पुस्तिकेच्या उपयुक्ततेविषयी माहिती दिली. यावेळी मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांनी समितीच्या कार्याचा आढावा आणि उपक्रमाबाबत माहिती सांगितली. …
Jan 2, 2021, 11:12 IST
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मराठा पाटील युवक समितीतर्फे सोयरीक या उपवर युवक- युवती परिचय पुस्तिकेचे प्रकाशन कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.पुस्तिकेचे संपादक रमेश टिकार यांनी पुस्तिकेच्या उपयुक्ततेविषयी माहिती दिली. यावेळी मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांनी समितीच्या कार्याचा आढावा आणि उपक्रमाबाबत माहिती सांगितली. समितीचे सचिव प्राध्यापक योगेश मैसागर, शेगाव मराठा युवक समिती शहर अध्यक्ष श्याम अढाव आदींची उपस्थिती होती.