आश्रय बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे शेगावकरांच्या सेवेत स्वर्गरथ

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आश्रय बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे स्वर्ग रथ शेगावकरांच्या सेवेत रुजू करण्यात आला आहे. ही सेवा मोफत राहील. शेगाव शहराची व्याप्ती लक्षात घेता स्मशानभूमी बरीच लांब आहे. या अगोदर एकच स्वर्गच सेवेत रुजू असल्यामुळे आश्रय बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष श्री एस सलामपुरिया यांनी दुसरा स्वर्गरथ सेवेत रुजू करण्याचा निर्णय …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आश्रय बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे स्वर्ग रथ शेगावकरांच्या सेवेत रुजू  करण्यात आला आहे. ही सेवा मोफत राहील.

शेगाव शहराची व्याप्ती लक्षात घेता स्मशानभूमी बरीच लांब आहे. या अगोदर एकच स्वर्गच सेवेत रुजू असल्यामुळे आश्रय बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष श्री एस सलामपुरिया यांनी दुसरा स्वर्गरथ सेवेत रुजू करण्याचा निर्णय घेतला आणि आजपासून सेवेत रुजू झाला, अशी घोषणा त्यांनी सर्वप्रथम बुलडाण्याला लाईव्हशी बोलताना केली. या अगोदर सुद्धा या संस्थेची सामाजिक कार्याची अखंड परंपरा आहे. लॉकडाऊन काळामध्ये गरजू लोकांना धान्य, कपडे वाटप संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले होते. कुठलाही गरजू व्यक्ती संस्थेच्या संपर्कात आला असता त्याला संस्था मदत करते व यानंतरही शेगाव शहरामध्ये अनेक सामाजिक कार्य राबविण्याचा आमचा मानस आहे, असे श्री एस सलामपुरिया यांनी सांगितले.