आमदार संजय गायकवाड चितोड्यात!, म्हणाले… पुन्हा असा हल्ला झाला तर मी 10 हजारांची फौज घेऊन येतो, सगळ्यांना एका फटक्यात सरळ करेन; ॲट्रॉसिटीचा धाक धाकवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज!!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चितोडा (अंबिकापूर) (ता. खामगाव) येथे 19 जूनला वाघ कुटूंबावर हल्ला झाला होता. ॲट्रॉसिटीचा धाक धाकवत चितोडा येथील गावगुंड पोत्या उर्फ रमेश हिवराळे याने गावात उच्छाद मांडल्याने गावकरी भयभीत आहेत. आज, 30 जूनला चितोडा गावाला बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भेट दिली. हल्ला झालेल्या वाघ कुटूंबाला आम्ही तुमच्यासोबत आहोत. घाबरण्याची गरज …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चितोडा (अंबिकापूर) (ता. खामगाव) येथे 19 जूनला वाघ कुटूंबावर हल्ला झाला होता. ॲट्रॉसिटीचा धाक धाकवत चितोडा येथील गावगुंड पोत्या उर्फ रमेश हिवराळे याने गावात उच्छाद मांडल्याने गावकरी भयभीत आहेत. आज, 30 जूनला चितोडा गावाला बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भेट दिली. हल्ला झालेल्या वाघ कुटूंबाला आम्ही तुमच्यासोबत आहोत. घाबरण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्‍यांनी धीर दिला. ॲट्रॉसिटी कायद्याचा कुणी धाक दाखवत असेल तर तुम्हीही त्याच्याविरोधात दरोड्याची तक्रार द्या. खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना संघटित होऊन उत्तर द्या, असे आवाहन आमदार गायकवाड यांनी यावेळी केले. चितोड्यात येण्यासंदर्भात आपल्याला थेट ‘मातोश्री’वरून आदेश आल्याचे त्यांनी सांगितले.

बिहार आणि उत्तरप्रदेशला लाजवणारा हा हल्ला आहे. गुंडगिरी या गावात फोफावली आहे. ॲट्रॉसिटी हा कायदा रक्षणाकरिता आहे. मात्र या कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंग करता येथे केला जातो. ॲट्रॉसिटीचा धाक दाखवून पैसे उकळले जातात. अवैध धंदे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात. एक विशिष्ट समाज कमी संख्येने असल्याने आणि संघटित नसल्याने इथे वारंवार हल्ले होतात. मागच्या एका प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरुणाच्या खिशात चिठ्ठी सापडूनही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे पोत्याची दहशत तयार झाली आणि दुर्दैवाने सगळ्या समाजानेही त्याला साथ दिली. गावगुंडाचे समर्थन लोक करतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्यावर कुणी अन्याय करत असेल तर आसपासच्या 25 गावांच्या तरुण पोरांची संघटित टीम बनवा. अन्याय होईल तेव्हा सर्व जण तुटून पडा. भविष्यात जर इथे आणखी असा हल्ला झाला तर मी स्वतः दहा हजारांची फौज घेऊन येईन आणि एका फटक्यात सरळ करेन, असेही आमदार गायकवाड म्हणाले. अन्याय सहन करू नका, कायदा ठेचत नसेल तर आपण ठेचा. सगळी शस्‍त्र अस्‍त्र, सर्व ताकद पुरवीन, असेही आमदार गायकवाड म्हणाले.

19 जूनला वाघ कुटूंबावर पोत्या उर्फ रमेश हिवराळे याने जमावासह हल्ला चढवला होता. चितोडा हे गाव नंबर दोनच्या धंद्यांचे माहेरघर बनले आहे. ठाणेदार पोत्याला पाठिशी घालतात, असा आरोप दोन दिवसांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनी चितोड्यात येऊन केला होता. खासदार जाधवांनी खडसावल्यानंतर याप्रकरणात हिवराळे गटातील तिघांना 28 जून रोजी अटक करण्यात आली होती.