आमदार कुटे, ठाणेदार टाले यांनी शहरभर चालवली सायकल!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सायकल चालविल्यामुळे पर्यावरण रक्षण, आरोग्याचे रक्षण तर होतेच परंतु इंधन वाचत असल्यामुळे पर्यायाने देशाचे परकीय चलन वाचते व त्या माध्यमातून देशसेवाच घडते, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार संजय कुटे यांनी येथे केले. सायकल चालवा निरोगी राहा… सायकल चालवा पर्यावरण वाचवा… सायकल चालवा इंधन वाचवा… असा संदेश …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सायकल चालविल्यामुळे पर्यावरण रक्षण, आरोग्याचे रक्षण तर होतेच परंतु इंधन वाचत असल्यामुळे पर्यायाने देशाचे परकीय चलन वाचते व त्या माध्यमातून देशसेवाच घडते, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार संजय कुटे यांनी येथे केले.


सायकल चालवा निरोगी राहा… सायकल चालवा पर्यावरण वाचवा… सायकल चालवा इंधन वाचवा… असा संदेश देत नगरपालिका आणि सामाजिक संस्था रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने 23 जानेवारी रोजी भव्य सायकल रॅली काढण्यात आली होती. गांधी चौक नगरपालिका कार्यालयासमोरून रॅलीला सुरुवात झाली. आ. डॉ. कुटे, नगराध्यक्ष शकुंतला पांडुरंग बुच, शेगाव शहर पोलीस स्टेशन ठाणेदार संतोष टाले आदींनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. आमदार कुटे, ठाणेदार टाले हे स्वतः रॅलीमध्ये सायकल चालवत सहभागी झाले. नगरपालिकेच्या कार्यालयापासून सुरू झालेली ही सायकल रॅली मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक, अग्रेसन महाराज चौक, रेल्वे स्थानक सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहासमोरून तहसील कार्यालय चौक श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज समोरून खामगाव रोडवर असलेल्या हॉटेल पंचवटीवर पोहोचली. यावेळी लकी ड्रॉद्वारे दोघांना शेगाव अर्बन बँकेच्या वतीने सायकल सप्रेम भेट देण्यात आली. सायकल विजेत्यांमध्ये शेगाव येथील कुमारी चांडक व खामगाव येथील हितेश जैन हे दोघे भाग्यवान ठरले. याचप्रमाणे स्पेशल स्पोर्ट्स शूजकरिता दोघांची नावे लकी ड्रॉ काढण्यात आली. यामध्ये मयूर अग्रवाल, मास्टर खाडे हे दोघे भाग्यवान ठरले. यावेळी माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल, नगर पालिकेच्या उपाध्यक्ष श्रीमती कलोरे, सर्व सभापती, शेगाव नगरपालिकेचे शहर अभियान  व्यवस्थापक नानाराव इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.