आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर सामाजिक उपक्रमांची रेलचेल, बुलडाणा लाइव्हच्या दादा विशेषांकाचे थाटात प्रकाशन
खामगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजप जिल्हाध्यक्ष तथा खामगावचे आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त 5 फेब्रुवारीला आयोजित रक्तदान शिबिरात 193 युवकांनी रक्तदान केले. भाजप युवा-युवती मोर्चा, विद्यार्थी आघाडीने हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात बुलडाणा लाइव्हने आ. फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध केलेल्या दादा पुरवणीचे प्रकाशनही श्री. फुंडकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. प्रशांत बोबडे होते. सोशल मीडिया प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर, नगराध्यक्षा सौ. अनिताताई डवरे, उपाध्यक्ष मुन्नाभाऊ पुरवार, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, जिल्हा सचिव संजय शिनगारे, तालुकाध्यक्ष संजय गव्हाळ, विजय भालतिडक, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, न.प. गटनेते राजेंद्र धानोकार, पप्पूसेठ अग्रवाल, चंदूसेठ मेहता आदींची उपस्थिती होती. दरवर्षी हे शिबिर भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा आयोजित करत असतात. सूत्रसंचालन शेखर कुलकर्णी व रघुनाथ खेरडे यांनी केले.
आकाशदादांनी केले बुलडाणा लाइव्हचे कौतुक
अवघ्या नऊ महिन्यांत बुलडाणा लाइव्हने घेतलेल्या भरारीचे आमदार आकाशदादांनी कौतुक केले. दादा पुरवणीबद्दल बोलताना त्यांनी सर्वांगसुंदर असा उल्लेख करत बुलडाणा लाइव्हच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.