आचासंहितेमुळे खामगावातील 18 विकासकामे लांबणीवर!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका खामगावच्या विकासाला बसला असून, 18 विकासकामांची फेरनिविदा रद्द करण्यात आली आहे.
शहराच्या विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 5 कोटींचा निधी सरकारने मंजूर केला आहे. यात शहरातील उद्याने विकसित करणे, स्केटिंग ग्राऊंड व कुंपन भिंतीचे बांधकाम, खुली व्यायाम शाळा साहित्य, बाल मनोरंजन साहित्य, सभागृह बांधकाम, मराठा पाटील सभागृहाची संरक्षण भिंत, बर्डे प्लॉट भागातील सभागृह बांधकाम, लिंगायत वाणी समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधकाम, ओंकारेश्वर स्मशानभूमीत सभागृह बांधकाम आदी कामे केली जाणार आहेत. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार आहेत. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा रद्द झाल्याने आता पुढे कधी या निविदांना मुहूर्त लागतो, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.