असे ठरले सौ. उषाताईंचे हळदी-कुंकू जरा हटके!; कॉलनीतीलच काय पण अख्खे शेगाव म्हणाले, वाहऽऽ काकू!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या मकरसंक्रांतीनिमित्त केल्या जाणार्या हळदी-कुंकू कार्यक्रमाची धूम आहे. महिला वर्ग सध्या यातच व्यस्त आहे. आपल्याकडील हळदी-कुंकू काहीसे हटके ठरावे यासाठी प्रत्येक जण प्रयत्नरत आहे. अशातच शेगाव येथील सौ. उषाताई सूर्यकांत सपकाळ या आगळीवेगळी संकल्पना मांडून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरल्या आहेत. हिंदू धर्माला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या मकरसंक्रांतीनिमित्त केल्या जाणार्‍या हळदी-कुंकू कार्यक्रमाची धूम आहे. महिला वर्ग सध्या यातच व्यस्त आहे. आपल्याकडील हळदी-कुंकू काहीसे हटके ठरावे यासाठी प्रत्येक जण प्रयत्नरत आहे. अशातच शेगाव येथील सौ. उषाताई सूर्यकांत सपकाळ या आगळीवेगळी संकल्पना मांडून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरल्या आहेत.

हिंदू धर्माला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हिंदू धर्मात वर्षभर अनेक सण-उत्सव आपण साजरे करतो. 2020 मध्ये कोरोना विषाणूने जगात थैमान घातले. त्यामुळे आपण वर्षभर सण-उत्सव साजरे करू शकलो नाहीत. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सौ. उषाताईंनी घरातच कोरोना काळात झालेल्या संपूर्ण सण-उत्सवांचा अतिशय सुंदर देखावा सादर केला आहे. यानिमित्ताने संपूर्ण कॉलनीतील महिलांनी एकाच दिवशी सर्व सण -उत्सव साजरा करण्याचा आनंद लुटला. सौ. सपकाळ या महावितरणमधून निवृत्त झालेले सूर्यकांत सपकाळ यांच्या पत्नी असून, संपूर्ण शेगाव मध्ये त्यांच्या या अभिनव कल्पनेची चर्चा होत आहे.