अपंग, वृद्ध शिक्षकांना निवडणूक कामातून वगळा; खामगावमध्ये शिक्षक सेनेची मागणी
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अपंग शिक्षक, 55 वर्षांवरील शिक्षकांना ग्रामपंचायत निवडणूक कामातून वगळावे आणि महिला शिक्षिकांना जवळचे निवडणूक केंद्र देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या खामगाव तालुका शाखेने उपविभागीय अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष नीलेश चव्हाण, तालुका सरचिटणीस मंगेश पवार, तालुका कार्याध्यक्ष नीलेश कठाळे, संपर्कप्रमुख काशिनाथ वाघमारे आदींची उपस्थिती होती.
Jan 1, 2021, 19:25 IST