खामगाव तालुक्यात वन्यप्राण्यांची दहशत: पातोंडा-पेडक्यात वाघ, निळेगाव धरणाजवळ बिबट्या; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...शेतकरी म्हणतात, वावरात कसं जाऊ...?
Jun 6, 2026, 21:10 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सलग दुसऱ्या दिवशी वन्यप्राण्यांच्या दहशतीने नागरिक हादरले आहेत. पातोंडा-पेडका शिवारात वाघ दिसल्याच्या घटनेनंतर आता निळेगाव धरणाच्या भिंतीखाली बिबट्या आढळून आल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या दुहेरी घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकं काय घडलं?
स्थानिक शेतकरी बांधवांच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत पातोंडा-पेडका शेतशिवारात एक वाघ मुक्तपणे फिरताना दिसला. या घटनेची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी संध्याकाळी निळेगाव धरणाच्या सुरक्षा भिंतीखाली बिबट्या असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. दोन्ही हिंस्र प्राणी मानवी वस्तीजवळ आढळल्याने पातोंडा, पेडका व निळेगाव या तीनही गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
वाघ आणि बिबट्या. शेती करायची कशी? जीव मुठीत घेऊन शेतात जावं लागतंय," अशी संतप्त प्रतिक्रिया पातोंडा - पेडका येथील शेतकऱ्यांनी दिली. पावसाळ्याच्या तोंडावर पेरणीची कामे सुरू असताना या घटनांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने तातडीने दखल घेवून य दोन्ही हिंस्र प्राण्यांची दाखल घ्यावी शेतकऱ्यांची मागणी.