क्या बात..! छावा चित्रपटातील कलाकार खामगावात; नॅशनल हायस्कूलला दिली भेट; सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह...
Updated: Mar 8, 2025, 12:10 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेल्या विकी कौशल, औरंगजेबाची भूमिका केलेल्या अक्षय खन्ना यांनी प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाने स्थान मिळवले आहे. देशभरात या चित्रपटाचे विविध "स्पेशल शो" देखील आयोजित करण्यात येत आहेत. दरम्यान या चित्रपटात काम केलेल्या काही कलाकारांनी खामगावातील श्री. अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल ला भेट दिली. कलाकारांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. यावेळी कलाकारांसोबत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळाला.. छावा चित्रपटात समन्वयक म्हणून काम पाहणारे बुलडाणा जिल्ह्यातील दिलीप घेवंदे, अमोल निकाळजे, शैलेंद्र नाटेकर या कलावंतांची यावेळी उपस्थिती होती..
कलाकारांनी आपल्या भाषणात
छावा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनुभव कथन केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर चित्रपट असल्याने अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी देता आल्या. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अनुभवता आला. मावळ्यांची भूमिका साकारतांना उर अभिमानाने भरून आला असे उद्गार यावेळी कलाकारांनी काढले. सौ. नंदा उदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ लिपीक कु. कल्पना सोनटक्के यांच्या नियोजनातून कलाकारांची शाळेला भेट मिळाली...