काय राव स्मशानभूमीच खाल्ली..! शेगाव तालुक्यातील तिव्हाण च्या ग्रामस्थांचा आरोप..! खासदार निधीतून स्मशानभूमीवर दाखवला ७ लाखांचा खर्च..दोषी कोण?
तिव्हान.बु येथे खासदार निधीतून सुमारे ७ लाख रुपये खर्चून स्मशानभूमी विकासाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मंजूर अंदाजपत्रकातील अनेक बाबींची अंमलबजावणी न करता काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी म्हटले आहे की, कामाच्या गुणवत्तेची योग्य तपासणी न करता संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले. तसेच सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी, आणि कंत्राटदार यांच्या संगनमतातून करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी काम सुरू असताना अंदाजपत्रकाची प्रत मागितली असता ती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा दावा केला आहे. याशिवाय कामाच्या ठिकाणी आवश्यक माहिती फलकही लावण्यात आला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर स्मशानभूमी विकासकामाची तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणावी, तसेच दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या संबंधित संबंधित अधिकाऱ्याला सदर प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची आदेश देण्यात आले होते. मात्र अजून देखील संबंधित अधिकाऱ्याने यावर कुठली कारवाई केली नाही.