दुर्दैवी ब्रेकिंग! भीषण अपघाताने जिल्हा हादरला; नांदुऱ्यात ट्रक आणि इर्टिका कारचा अपघात; पती पत्नीसह मुलाचा मृत्यू! चौघे गंभीर जखमी...

 

नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा बायपास जवळ आज भीषण अपघात झाला . एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतकांमध्ये पती-पत्नी व त्यांच्या मुलाचा समावेश आहे. अपघातात ठार झालेले कुटुंब लोकरवाडी ता. माहूर येथील राहणारे आहे.
 देवराम गंगाराम पवार (६०) , बबीता देवराव पवार (५५) आणि निकेतन देवराव पवार (२६) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. ट्रक आणि इर्टिका कारची धडक झाल्याने हा अपघात झाला. इर्टिका कार मधील अन्य चौघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खामगाव येथे उपचार सुरू आहेत. आज ,१३ मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. मृतदेह कारमधून काढण्यासाठी २ तास प्रयत्न करावे लागले. घटनास्थळी नांदुरा पोलिसांनी धाव घेऊन मदत कार्य राबवले.. ओम साई फाउंडेशन च्या स्वयंसेवकांनी देखील मदत कार्याला हातभार लावला.