दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक!दोन ठार..खामगाव तालुक्यातील दोन कुटुंबातील पोरांचे बापाचे छ्त्र हरपले.. .
Oct 13, 2025, 11:36 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक घेवून दोघे जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील लाखनवाडा - आंबेटाकळी रोडवर घडली आहे.
योगेश ज्ञानेश्वर जावळे (३०) , गणेश श्रीराम पांढरे (३९) दोघेही रा.लाखनवाडा असे ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.यातील योगेश जावळे हा त्याच्या सासारवाडी वरून महान पिंजर येथून रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान लाखनवाडा येथे आपल्या दुचाकी ने येत होता.
गणेश पांढरे हा कामानिमित्ताने लाखनवाडा येथून आंबेटाकळी येथे दुचाकीने जात होता.यावेळी दोघांच्या दुचाकीने नियंत्रण सुटल्याने दोन्ही दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली यातील दोघेही जागीच ठार झाले आहेत.यातील दोघेही विवाहित असून योगेश जावळे याला एक वर्षाची लहान मुलगी आहे.गणेश पांढरे याला सुद्धा एक मुलगा एक मुलगी आहे.या दोघांच्या निधनामुळे लाखनवाडा गावावर शोकाकुल पसरला आहे.