चोरट्यांनो देवाला तरी घाबरा रे! खामगावात दानपेटी फोडली! घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद...
Sep 28, 2024, 10:58 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) श्री संकट मोचन हनुमान मंदिरात चोरट्यांनी मंदिराची दानपेटी फोडून हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना स्थानिक रेल्वे गेटजवळील मंदिरात उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक रेल्वे गेटजवळील श्री संकटमोचन हनुमान मंदिराचे पुजारी सकाळी पूजा करण्यासाठी मंदिरात गेले होते. यावेळी तीन दानपेट्यांपैकी एक दानपेटी फुटल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ विश्वस्तांना याबाबत माहिती दिली. अज्ञात चोरट्याने अंदाजे दोन हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघड झाले. घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. दरम्यान, मंदिराजवळ रेल्वे रुळावर एक दानपेटी पडलेली पोलिसांना दिसली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे.