संग्रामपूर तालुक्यातील काथरगावच्या महिला सरपंचांनी जमिनीत गाडून घेतले..! कारण काय? बातमीत वाचा...

 
Shegaon
संग्रामपूर(स्वप्नील देशमुख: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव पिंपरी येथे ग्रामपंचायतचे लोक नियुक्त सरपंच सुवर्णा गणेश टापरे सह उपसरपंच महिला सदस्य व शेतकऱ्यांसह भूमिगत आंदोलन केले. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व गारपोटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अद्याप शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळाली नसल्याने महिला सरपंचाने आंदोलनाचा पवित्रा घेतला.
 मागील २६ व २७ फेब्रुवारी रोजी फार मोठ्या प्रमाणात गारपीट व अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पिकाचे अतोनात नुकसान झाले होते.
त्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याकरिता तहसीलदार यांना निवेदन देऊन सुद्धा नुकसान भरपाई मिळली नसल्याने काल, १ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपासून काथरगाव पिंपरी येथे दहा ते बारा शेतकरी व महिला सरपंचासह भूमिगत आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.तहसीलदार प्रशांत पाटील यांनी भूमिगत झालेल्या सरपंच सुवर्णा गणेश टापरे यांना तात्काळ लेखी पत्र देऊन त्यांचे भूमिगत आंदोलनाला स्थगिती दिली.