"पाण्याला जाते पाणी घेउनी येते" म्हणाली! पण पुन्हा आलीच नाही! खामगावातून १९ वर्षीय तरुणी संशयास्पदरीत्या गायब; घरचे शोधून शोधून थकले..तुम्हाला दिसली का?

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरातील नगरपरिषद टर्निंग परिसरातून १९ वर्षीय युवती संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात मिसिंग प्रकरणाची कायम नोंद क्रमांक १६/२०२६ दाखल करण्यात आली असून पोलीसांनी तपास सुरू केला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवती २२ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास प्रवासासाठी थांबलेली असताना "पाण्याला जाते ,पाणी घेऊन येते’ असे सांगून एकटीच निघून गेली. मात्र, त्यानंतर ती परत न आल्याने तिचा शोध घेण्यात आला. नातेवाईकांनी परिसरात सर्वत्र शोधमोहीम राबवली, तरीही तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
अखेर नातेवाईकांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. हरविलेल्या युवतीचे वर्णन उंची अंदाजे ५.३ फूट, गोरा रंग, अंगात जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात काळे बूट असे आहे.
या घटनेनंतर पोलीसांनी तत्काळ नोंद घेत तपास सुरू केला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत. दरम्यान, संबंधित युवतीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ खामगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.