विठ्ठल भेटीची ओढ! घाटपुरी च्या श्री सद्गुरु श्रीधर महाराज संस्थांनच्या पायी दिंडीचे ११ जूनला पंढरीकडे प्रस्थान! २ जुलैला पोहोचणार पंढरीत....
May 22, 2025, 14:05 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): श्री सद्गुरु श्रीधर महाराज संस्थान, घाटपुरीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरसाठी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी ११ जून रोजी घाटपुरी येथील सद्गुरु श्रीधर महाराज सेवा मंदिरातून रवाना होणार असून, २ जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.
वारीच्या निमित्ताने २ जुलैपासून श्रीमद् भागवत कथा आयोजित करण्यात आली असून, ३ जुलै ते १० जुलै या काळात सर्व वारकऱ्यांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली आहे.
यासाठी इच्छुक भाविकांनी आपली नावनोंदणी लवकरात लवकर श्री सद्गुरु श्रीधर महाराज सेवा मंदिर, घाटपुरी येथे करावी, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.