दारू प्यायला बसले होते सरपंच! तिथं झाले मॅटर मग...बार वरून घरी जातांना झाला हल्ला; खामगावची घटना....

 
 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील सुटाळा बु येथील सरपंचावर लोखंडी रॉड ने हल्ला करण्यात आला. खामगावातील जीएस कॉलेज समोर ५ मार्चच्या रात्री साडेदहा वाजता हा प्रकार घडला. जखमी सरपंचावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याआधी सरपंच मित्रासोबत दारू पिण्यासाठी एका बार वर बसलेले होते. तिथे शेजारी बसणाऱ्या सोबत त्यांचा वाद झाला, त्याचेच रूपांतर या हल्ल्यात झाले..निलेश विनायकराव देशमुख (४२) असे जखमी सरपंचाचे नाव आहे..
  या प्रकरणाची तक्रार सरपंच निलेश देशमुख यांनी दिली आहे. तक्रारीनुसार काल सायंकाळी सरपंच निलेश देशमुख खामगाव येथील गौरव बारवर मित्रासोबत दारू पिण्यासाठी बसलेले होते. यावेळी त्यांच्या बाजूच्या केबिनमध्ये बसलेल्या मयूर किशोर सिद्धपुरा याच्यासोबत त्यांचा कॅन्टीन वर थुकण्याच्या कारणावरून त्यांचा वाद झाला. दरम्यान काही वेळानंतर सरपंच निलेश देशमुख हे घरी जात असताना जी एस कॉलेजच्या रोडवर आरोपी मयूर सिद्धपुरा याने सरपंच निलेश देशमुख यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून जखमी केले. रोहित मगर आणि प्रकाश जांगिड यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे सरपंच देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी मयूर सिद्धपुरा, रोहित मगर आणि प्रकाश जांगिड अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.