गुन्हेगारांचा संहार अन् सज्जनांचे रक्षण करणाऱ्या ठाणेदार किशोर तावडे यांची खाकितील माणुसकी;अपघात टाळण्यासाठी स्व:खर्चातून लावला सिग्नल...

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :गुन्हेगारांचा संहार अन् सज्जनांचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यामधील माणुसकीचे दर्शन खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर तावडे याच्या कार्यातून दिसले आहे.त्याचं सर्वत्र कौतूक होत आहे.
खामगाव तालुक्यातील पारखेड फाटा येथून खामगाव कडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर सिग्नल नसल्यामुळे अनेक वेळा अपघात होत असतात.ही गोष्ट लक्षात आल्यानंतर खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर तावडे यांनी पारखेड फाट्याचे स्वतः निरीक्षण करून कोणत्या ठिकाणी सिग्नल लावावा याची पाहणी केली होती.पाहणी केल्यानंतर स्व:खर्चाने पारखेड फाट्यावर सिग्नल लावला. यावेळी एएसआय कैलास चव्हाण, पोहेकॉ गोविंद इंगळे,पोहेकॉ बाळकृष्ण फुंडकर, श्याम देवकर यांनी परिश्रम घेतले.हा सिग्नल लावल्यामुळे पारखेड फाट्यावर दरवेळी होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे.ठाणेदार किशोर तावडे यांच्या कार्यामुळे,त्यांच्या खाकितील माणुसकीमुळे त्याचं पोलीस प्रशासनाचं सर्वत्र कौतुक होत आहे.