श्री संत पांडुरंग महाराज भोजने "भव्य पुण्यतिथी मोहत्सवाला'' गुरुवार पासून सुरुवात!महाराष्ट्रातील 'ख्यातनाम' कीर्तनकार लावणार उत्सवाला हजेरी...
Oct 23, 2025, 14:16 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):दरवर्षी प्रमाणे श्री संत पांडुरंग महाराज भोजने यांच्या भव्य पुण्यतिथी मोहत्सवाला गुरुवार पासून सुरुवात होणार आहे.
खामगाव तालुक्यातील अटाळी येथे श्री संत पांडुरंग महाराज भोजने यांचा भव्य पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.या उत्साहात आठवडाभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यासह दररोज रात्री ८.३० ते १०.३० श्री हरिकीर्तन असणार आहे.दरवर्षी कीर्तनाला अकोला जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील लाखो भाविक उपस्थित असतात.यावर्षी सुद्धा ह भ प श्री जनार्धन राजपूत (धुळे), श्री रामराव महाराज ढोक (नागपूर),श्री निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), श्री केशव महाराज (उखळीकर), श्री कान्होबा देहूकर (पंढरपूर), श्री नरेंद्र गुरव (नाशिक),श्री अमृत जोशी (बीड), काल्याचे कीर्तन विदर्भरत्न रामयनाचार्य ह भ प श्री संजय महाराज पाचपोर यांचे असणार आहे.
श्री संत पांडुरंग महाराज भोजने (अटाळी) या संस्थानचे अध्यक्ष आधी राज्याचे कृषिमंत्री स्व भाऊसाहेब (पांडुरंग) फुंडकर होते.सध्या राज्याचे कामगार मंत्री अँड आकाश फुंडकर हे संस्थानचे अध्यक्ष आहेत.विशेष म्हणजे गेल्या पस्तीस वर्षापासून हा पुण्यतिथी महोत्सव अटाळी येथे साजरा होत असतो.या वर्षी २०२५ ला हा छात्तीस वा भव्य पुण्यतिथी मोहत्सवा अटाळी येथे साजरा होणार आहे.