शॉकिंग! विजेचा करंट लागून दोन भावांचा मृत्य; डोलारखेड येथील घटना! देवीसमोर डेकोरेशन करतांना झाला अपघात...
जलंब पोलिस स्टेशन अंतर्गत डोलारखेड येथे चैतन्य नवदुर्गा उत्सव मंडळा तर्फे नवदुर्गा उत्सव साजरा करण्यात येत आहे. ३ ऑक्टोबर रोजी स्थापनेच्या पश्चात आरती झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गोवर्धन संतोष देठे (२१) त्याचा चुलत भाऊ शुमम गजानन देठे (२२) व मंडळातील ४ ते ५ कार्यकर्ते हे लोखंडाचे फेन्सिंग करीत असताना त्यात अचानक वीजप्रवाह सुरू झाला.
वीज प्रवाहाचा धक्का शुभम व गोवर्धन यांच्या सह चार ते पाच कार्यकर्त्यांना बसला. यामध्ये शुभम देठे व गोवर्धन देठे यांची प्रकृती गंभीर झाली. ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी दोघांना तातडीने उपचारासाठी खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. ४ ऑक्टोंबर रोजी येथील शासकीय रुग्णालयात शविच्छेदन करून नंतर दोघा भावांचे प्रेत त्यांचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांवर डोलारखेड येथील समशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.