धक्कादायक!लग्न जमत नसल्याने खामगाव'च्या तरुणाचे टोकाचे पाऊल!विहीरीत उडी घेवून...

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चाळीशी पार झाली मात्र लग्नच जमत नसल्याने खामगाव'च्या चाळीस वर्षीय तरुणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सध्याच्या काळात मुलींची संख्या कमी असल्याने मुलांचे लग्न जमावने खूपच कठीण झाले आहे. अनेक गावात, शहरात मुलींच्या तुलनेत कितीतरी तरुण आज लग्ना बिना आहेत. यातच चाळीशी पार होत आहे.मात्र लग्नच जुळत नसल्याने सचिन मारोती डंबेकर (४०) रा.फाटकपुरा (खामगाव) या तरुणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सचिन हा २७ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० दरम्यान घरून निघून गेला होता. बराच उशीर झाला मात्र घरी आलाच नाही. सर्वत्र शोध घेतला शेवटी आज ३० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान फाटकपूरा भागातील रुस्तम बेग याच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत सचिन डंबेकर याचा मृतदेह आढळून आला.