मलकापुरात एसटी भाडेवाढ विरोधात उबाठा शिवसेना आक्रमक! परिवहन मंत्र्यांची थेट प्रतीकात्मक अंत्ययात्राच काढली..डायरेक्ट दफनविधी उरकला...
Jan 28, 2025, 16:19 IST
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील महायुती सरकारने एसटी भाडेवाढ केलेली आहे. ही भाडेवाढ सामान्य जनतेच्या पचनी पडलेली नाही. आता विरोधकांनी देखील या मुद्द्याला हत्यार बनवले आहे. आज जिल्हाभर उबाठा शिवसेनेच्या वतीने एसटी भाडेवाढीचा निषेध करीत आंदोलने करण्यात येत आहे. मलकापुरात तर उबाठा शिवसेनेने अत्यंत आक्रमक स्टाईलने आंदोलन केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून बसस्थानक परिसरात दफनविधी उरकण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात शहरप्रमुख प्रमुख गजानन ठोसर , तालुकाप्रमुख दिपक चांभारे, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना उपशहर प्रमुख समद कुरेशी, उपशहर प्रमुख शकील जमादार, कामगार सेना तालुकाप्रमुख राम थोरबोले, कामगार सेना शहर प्रमुख हरीदास गणबास, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, वाहतूक सेना शहरप्रमुख इमरान लकी, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र काजळे, युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड, विश्वनाथ पुरकर, अक्षय रायपुरे गणेश सुशीर,सत्तार शहा, उदय जोशी, कलीम कुरेशी, राजा कुरेशी ,सोहिल जमादार, वसीम जमादार, जुबेर खान, कैलास ब्राह्मंदे, छोटू इंगळे, गणेश सुरडकर सह असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती. यावेळी "जय भवानी जय शिवाजी" "हा आवाज कुणाचा शिवसेनेचा" "एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे" "अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही" अशा गगनभेदी घोषणा देण्यात आला...