वॉश रूम मध्ये जाण्याचा बहाणा करत बेडरूम मध्ये गेली अन् चुकीचं काम करतांना रंगेहात पकडली; मलकापुरात मोलकरणीचा प्रताप; घरमालकीण बाईने मॅटर पोलीस ठाण्यात नेले...

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापुरात एक अजब गजब घटना समोर आली आहे..एका मोलकरणीची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली..बेडरूम मध्ये चुकीचे काम करतांना तिला रंगेहाथ पकडण्यात आले.. घर मालकीण बाईने या प्रकरणाची तक्रार थेट पोलीस ठाण्यात केली आहे..

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटना मलकापुरातील ओमनगर परिसरातील आहे. ओमनगरातील अपर्णा सदावर्ते यांच्या घरी एक महिला मागील चार महिन्यांपासून घर कामासाठी कामाला आहे. काल दुपारी एक वाजेच्या सुमारास मोलकरीण महिला वॉशरूमला जाते असे सांगून वरच्या मजल्यावरील बेडरूम मध्ये गेली. त्याचवेळी सदावर्ते यांचे पती बेडरूम मध्ये गेले असता त्यांना मोलकरीण महिला लोखंडी कपाटाचे लॉकर उघडताना दिसली.

तिला विचारणा केली असता तिने काही चुकीचं नसल्याचा दावा केला. मात्र कपाटाची पाहणी केली असता लॉकर मधून ४ रुपये रोख, सोनसाखळी, अंगठी, मंगळसूत्र असा एकूण ६ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे दिसले.. याप्रकरणी अपर्णा सदावर्ते यांनी मलकापूर पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी मोलकरीन महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..