खामगाव ग्रामीण पत्रकार संघा'द्वारे 'पत्रकार दिनानिमित्ताने' बोरी - अडगांव येथे रामपाल महाराजांचा राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रम!
Jan 5, 2025, 09:51 IST
खामगांव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ खामगाव'च्या वतीने पत्रकार दिनी बोरी अडगाव येथे रामपाल महाराजांचा राष्ट्रीय किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
खामगाव तालुक्यातील बोरी - अडगांव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ खामगांव'च्या वतीने पत्रकार दिनानिमित्ताने ७ जानेवारी रोजी राष्ट्रीय कीर्तनकार रामपाल महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी हे राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमोद बापू देशमुख, मुख्य मार्गदर्शक गजाननराव वाघमारे यांचीही उपस्थिती असणार आहे. यामध्ये सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक, क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल.या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून प्रबोधनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ खामगांव तालुका अध्यक्ष बिलाल खा पठाण, उपाध्यक्ष सुधीर टीकार,सचिव सचिन बोहरपी, तालुका संघटक संदीप राठोड यांनी केले आहे.