संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने अटाळी'त हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण!

 

या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, यासह विविध धार्मिक कार्यक्रमांसह दररोज रात्री महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे हरिकीर्तनाचे आयोजन दररोज याठिकाणी करण्यात येत होते. आज ९ नोव्हेंबर रोजी रामायणाचार्य ह भ प संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली आहे.यावेळी तालुक्यातील हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण याठिकाणी करण्यात आले आहे.