संग्रामपुर तालुक्यात महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन; सिंधुदुर्गातील छत्रपती शिवरायांचा पुतळा अवमान प्रकरण...

 
संग्रामपूर
संग्रामपूर(स्वप्निल देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेचा निषेध म्हणून संग्रामपूर तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. वरवट बकाल येथे झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बेताल वक्तव्ये करीत असल्याचा आरोप करीत नितेश राणे यांचाही महाविकास आघाडीने निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही असे यावेळी बोलतांना प्रसेनजित पाटील म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी प्रसेनजीत पाटील यांच्यासह स्वाती वाकेकर, रामविजय बुरुंगले, अमोल ठाकरे, राजेंद्र वानखेडे, संजय मारोडे, स्वप्निल देशमुख, अमित भोंगळ,विजय मारोडे , सुनील मुकुंद यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.