लढू एकजुटीने..!बोराखेडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्करोग दिनी घेण्यात आली शपथ!

 
  
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):दरवर्षीप्रमाणे ४ फेब्रुवारी हा दिवस कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश म्हणजे कर्करोगाबद्दल जनजागृती वाढवणे लवकर निदान आणि योग्य उपचार महत्त्वाचे असल्याचा संदेश देणे तसेच कर्करोगाच्या लढाईत समर्थन देणे आहे. विविध ठिकाणी कर्करोग जनजागृती मोहीम साजरी केली जाते. यामध्ये ठीक ठिकाणी रॅली काढल्या जाते. चर्चासत्रे आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजन केले जाते. बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने कर्करोग जनजागृतीपर शपथ घेण्यात आली. उपस्थितांना कर्करोग या या आजाराविषयी आरोग्य शिक्षण देऊन प्रतिबंधात्मक खबरदारी विषयक सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक थिगळे, डॉ.अनिकेत चिंचोले, H.A श्री.सुनिल पडघान , LSO.श्री.गजानन वैरी, DEO,.पंकज थिगळे ,LHV.श्रीमती.मंगला वानखेडे , आरोग्य सेवक गवळी,आरोग्य सेविका ,मनिषा आडे ,माधुरी कणखर ,परिचर सिंधुताई गायकवाड, भुसारी, तसेच आशा सेविका उपस्थीतीत होत्या.
डॉ. थिगळे म्हणाले, व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र...
यावेळी संबोधन करतांना डॉ.थिगळे म्हणाले की, कर्करोगाची अनेक कारणे आहेत मात्र तंबाखूजन्य पदार्थ आणि दारू यामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. तोंडात पांढरा चट्टा किंवा लाल चट्टा होणे किंवा तोंडाची उघड कमी होणे आदी लक्षणे दिसत असल्यास भविष्यात कॅन्सर मध्ये रूपांतर होण्याचा धोका असतो. अशावेळी कॅन्सर तज्ञांचा नियमित सल्ला घेणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आणि व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे असे ते म्हणाले...