खामगावात चाललं काय?महिला संचालिकेचे अपहरण पतीची पोलिसात धाव;काँगेसच्या दोन मोठ्या नेत्यांवर अपहरणाचा आरोप..

 
 खामगाव( भागवत राऊत :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव बाजार समितीच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली आहे. महिला संचालिका सौ वैशाली दिलीप मुजुमले यांचे राहत्या घरून अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली आहे. महिला संचालिका सौ वैशाली दिलीप मुजुमले यांचे त्यांच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्यांचे पती दिलीप वसंता मुजुमले यांनी केला आहे. काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील,स्वप्नील ठाकरे यांच्यावर अपहरणाचा गंभीर आरोप मुजुमले यांच्या पतीने केला आहे.माझ्या पत्नीला शेगाव येथील ज्ञानेश्वर पाटील यांच्या घरी डांबून ठेवले आहे.

तिला तात्काळ सोडवा घटनेनंतर खामगाव ते शेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.अप्पर पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कारवाईचे आश्वासन देत केले विशेष पथक शेगावच्या दिशेने रवाना केले आहे.यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा सानंदा यांच्याच ताब्यात राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.