खामगाव हादरले ! १४ वर्षीय मुलावर बलात्कार! जिल्हा परिषद शाळेत नेऊन दोघांनी केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार....
Jan 3, 2025, 15:47 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर दोघा नराधमांनी बळजबरी लैंगिक अत्याचार केला आहे. खामगाव नांदुरा रोडवरील जिल्हा परिषद शाळेत हा खळबळजनक प्रकार घडलाय.. याप्रकरणी दोघा नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार पिडीत मुलगा १४ वर्षाचा असून ४० टक्के अंध आहे. त्याच्या असहायतेचा फायदा नराधमांनी घेतला. स्वप्निल दिलीप गवारगुरु (२९, रा. धोबी खदान, खामगाव) आणि आशिष अरुण शिंदे (३६, रा. हरी फैल, आंबेडकर नगर) अशी नराधम आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी पिडीत मुलाच्या होते. दोघांनी १ जानेवारीच्या दिवशी पिडीत मुलाला जिल्हा परिषदेत शाळेत नेले. तिथे त्याच्याशी अनैसर्गिक संभोग केला..या घटनेनंतर पिडीत तरुणाला वेदना होऊ लागल्याने त्याने घडला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत पोलिसांना अवगत करून दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे...