खामगाव अर्बन बँकेच्या विस्तारित कक्ष शाखेचा उद्या बुलढाण्यात स्थानांतरण सोहळा! भाईजींच्या हस्ते होणार उद्घाटन...
May 27, 2025, 14:32 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दि खामगाव अर्बन बँकेच्या विस्तारित कक्ष शाखेचा स्थानांतरण सोहळा उद्या २८ मे रोजी बुलढाण्यात संपन्न होत आहे. जिजामाता प्रेक्षागार समोरील सिद्धश्री बिल्डिंग, टिळकवाडी, बस स्टँड रोड येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे..
ग्राहकांच्या विश्वासावर खरे उतरत सहकार क्षेत्रात खामगाव अर्बन बँकेने यशाची नवनवीन शिखरे गाठली आहेत. बँकेची चौफेर प्रगती होत आहे. प्रगतीच्या या मालिकेत बुलढाणा येथील विस्तार कक्ष शाखेचे स्थानांतरण उद्या नव्या जागेत होत आहे. बुलढाणा अर्बनचे संस्थापक मा. श्री. भाईजी चांडक यांच्या हस्ते नव्या शाखेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक चित्तरंजनदासजी राठी यांची विशेष उपस्थिती राहणार असून खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रा. श्री विजयजी पुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा स्थानांतरण सोहळा संपन्न होणार आहे..
सर्व सभासद, ग्राहक ठेवीदार कर्जदार व हितचिंतक यांनी नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांचेसह बुलढाणा शाखेचे शाखाधिकारी नरेंद्र देशपांडे यांनी केले आहे.
