इंपॅक्ट!अखेर आरोग्य प्रशासनाला आली जाग! वानखेड मध्ये डेंग्यू निर्जंतुकीकरणास सुरवात; वानखेड गावा मध्ये सर्व्हेक्षण

 
वानखेड
 वानखेड(स्वप्निल देशमुख :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गावात गेल्या काही दिवसांपासून जिवघेण्या डेंग्यू आजाराची साथ सुरू असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान बुलडाणा लाइव्ह ने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित करताच आरोग्य प्रशासन झोपेतून जागे होत कामाला लागले आहे. आज अनेक भागात ग्रामपंचायत कडून सफाई कर्मचाऱ्यांमार्फत निर्जंतुकीकरण फवारणीला सुरूवात झाली. तर प्राथमिक आरोग्य केंद्र वानखेड च्या आरोग्य पथकाने गावा मध्ये काही भागात घरांना भेटी देऊन किटकशास्त्रीय सर्वेक्षण केले. 

 यावेळी ३५० घरांना भेटी दिल्या असता २३ घरात डासांच्या अळ्या मिळून आल्या आहेत. दरम्यान पथकाने नागरिकांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन करून काळजी घेण्याबाबत सूचना केल्या.

Gtuj
Related img.
मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने गावात डेंग्यू,. दररोज अनेक भागात रुग्ण सापडून येत असल्याने नागरिकांमध्ये मितीचे वातावरण पसरले आहे. डेंग्यू आजाराने ग्रस्त रुग्णांनी सामान्य रूग्णालयासह खासगी दवाखाने फूल झाल्याची वाईट परिस्थिती आहे. याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याने बुलडाणा लाइव्ह १६ सप्टेंबर रोजी यासंदर्भात सखोल वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला.
वृत्त प्रकाशित होताच झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन अखेर जागे झाले व कामाला लागले आहे.आज संग्रामपूर तालुक्यात अनेक ग्रामपंचायत कडून सफाई कर्मचाऱ्यांमार्फत निर्जंतुकीकरण फवारणीला झाली. सुरूवात तर प्राथमिक आरोग्य केंद्र वानखेडच्या आरोग्य पथकाने वानखेड गावात काही भागात जाऊन किटकशास्त्रीय सर्वेक्षण केले. यावेळी ३५० घरांना भेटी दिल्या व सर्वेक्षणामध्ये ३ रूग्ण तापाचे आढळुऩ आले.प्राथमिक आरोग्य केंद्र वानखेड चे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कड यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसाचा उपचार देण्यात आला.आणि संशयित डेंगू रुग्ण यांच्या घरामधील रुग्णांचे सॅम्पल घेऊन पुढील तपासणीसाठी बुलडाणा प्रयोगशाळेमध्ये पाठविले असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
Tjvj
Related img.

दरम्यान हौद, रांजन सह ९१८ भाड्यांची तपासणी देखील करण्यात आली. त्यावेळी २३ घरात डासांच्या अळ्या मिळून आल्या आहेत. त्यामुळे ३२ घरातील रांजन खाली करून घेण्यात आले असून नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्यात आल्याची माहिती आरोग्य सेवक श्री व्हि. पी. घोरसडे यांनी दिली आहे. 
Tkvvh
Related img.

वानखेड गावा मध्ये काही भागात सर्वेक्षण व डेंगू निर्मूलनबाबत मोहीम राबविताना आरोग्य विभागाचे कर्मचारी,प्राथमिक आरोग्य केंद्र वानखेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कड यांच्या मार्गदर्शनाखाली एच .जी. सोळंके आरोग्य निरीक्षक व्हि. पी.घोरसडे आरोग्य सेवक आर .के .बारबुद्धे, आरोग्य सेवक अक्षय पान्हेरकर, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी ,आशा वर्कर यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने ही तपासणी मोहीम राबविली.