चुलत भावाला मेसेज पाठवला " माझी बॉडी घेऊन जा".. अन् ! बोरी अडगाव च्या इंजिनियर तरुणाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? खामगाव तालुक्यात हळहळ...

 
 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यश अपयशाच्या स्पर्धेत कधी कधी माणूस पुरता गुंतून जातो.. कधीकधी अपयश पचवताही येत नाही..त्यातून काय होईल सांगता येत नाही.. खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील इंजिनीयर तरुणाच्या बाबतीतही तेच घडले.. बेंगलोर येथील एका चांगल्या कंपनीत तो नोकरीला होता होता..वर्क फ्रॉम होत सुरू होते.. पॅकेजही चांगले होते.. मात्र तो त्यावर समाधानी नव्हता..आपल्याला पाहिजे तसे यश प्राप्त झाले नाही ही खंत त्याच्या मनात होती..यातूनच त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली..विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी तसा मेसेज आपल्या चुलत भावाला पाठवला, त्यातूनच तरुणाच्या आत्महत्येचे कारणही समोर आले.. रामरतन विनायकराव टिकार (३२, रा. बोरी अडगाव, ता. खामगाव) असे तरुणाचे नाव आहे..
 
Advy
Advt. 👆
प्राप्त माहितीनुसार रामरतन बेंगलोर येथील एका कंपनीत नोकरीला होता. वर्क फ्रॉम होम असल्याने तो गावाकडूनच काम करत होता. त्याला कंपनीचे पॅकेजही होते मात्र तो त्यावर समाधानी नव्हता. ७ मार्चच्या संध्याकाळी त्याने चुलतभाऊ सुधीर विश्वासराव टिकार यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला. "मला चांगली नोकरी लागत नसल्यामुळे पाहिजे तसे यश प्राप्त झाले नाही, तुम्ही सकाळी येऊन माझी बॉडी विहिरीतून काढून घ्या" असे मेसेज मध्ये लिहिलेले होते. त्यामुळे सुधीर टिकार व त्यांचे काका या चुलत्या पुतण्यांनी अटाळी शिवारातील विहिरीवर जाऊन पाहिले असता रामरतन ने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.रामरतन आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत..