लग्न जुळवणाऱ्या ॲपवरून ओळख..! नंतर लग्नाचं वचन... वचन तर पाळल नाही, बिचारीचे आयुष्य उध्वस्त केलं...हॉटेल मध्ये बोलवून नको ते केलं! खामगावची घटना

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अविवाहित तरुणांची वाढती संख्या यामुळे सध्या लग्न जुळवून देणाऱ्या ॲपचा मार्केटमध्ये ट्रेंड सुरू आहे. बऱ्याच सोयरीकी या ॲपच्या माध्यमातून होत असल्या तरी या ॲपच्या माध्यमातून गैरप्रकार देखील होत असल्याचे समोर येत आहे. अनोळखी व्यक्तीशी ओळख, नंतर जवळीक आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार अशा घटना वारंवार समोर येत आहेत. अशीच एक घटना खामगाव तालुक्यात समोर आली असून याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी तरुणाने पीडित तरुणेशी ॲपच्या माध्यमातून ओळख केली.. त्यानंतर लग्नाचं अमिष दाखवत जवळील साधली.. तरुणीशी प्रेम असल्याचे नाटक करून तिच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले, तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आणि लग्नासाठी विचारणा झाल्यावर नकार देत गायब झाला..आता बिचारी पीडित तरुणी असहाय झाली आहे..तिला प्रचंड धक्का बसला आहे.

 पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा खामगाव तालुक्यातील अंबिकापुर येथील राहणारा आहे. आरोपीचे नाव कपिल बाबुराव हिवराळे असून तो ३४ वर्षाचा आहे. पीडित तरुणी अकोला जिल्ह्यातील एका गावची आहे..

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख मेट्रोमोनियल ॲप वर झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत, मैत्रीतून जवळीक. त्यातून पुढे प्रेमाचे नाटक ,त्यानंतर शारीरिक भूक...असा दोघांचा प्रवास राहिला. आरोपी  कपिलने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी अत्यंत जवळीक साधली, तिचा विश्वास संपादन केला.

खामगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये आरोपीने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. तरुणी कडून वेगवेगळी कारणे सांगून कधी रोख रक्कम, कधी ऑनलाईन व्यवहार तसेच सोन्याची चैन अशा स्वरूपात आतापर्यंत ९ लाख ५४ हजार रुपये घेतले.दरम्यान आता मात्र आरोपी लग्नाला नकार देत आहे.शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले.