अग्नितांडाव!टीमॅक्स सोल्युशन प्लांट'ला भीषण आग!आगेत प्लांट जळून खाक!;खामगाव'च्या अकोली शिवारातील घटना..!

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा):खामगाव तालुक्यातील अकोली शिवारात असलेल्या टीमॅक्स सोल्युशन प्लांट'ला काल ,२४ मार्चच्या संध्याकाळी अचानक आग लागली. यामध्ये सर्व प्लांट जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

खामगाव तालुक्यातील अकोली शिवारात Briquettes Manufacturing Plant Unit - 1 आहे. या प्लांटला काल सायंकाळी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये सर्व प्लांट जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा प्लांट १९२२ पासून चालू होता.अचानक आग लागल्याने संपूर्ण प्लांट जळून खाक झाला आहे.