या "हागऱ्या"ला शोधून काढा..! संग्रामपूर तालुक्यातील आठ गावांची मागणी! नेमकं मॅटर काय....आठ गावांचा पाणीपुरवठा का झालाय बंद?
Jun 28, 2025, 12:31 IST
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बातमीचे शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल ही काय बातमी देण्याची पद्धत आहे? पण काय करणार...प्रसंगच तसा आहे, अन् तो ही चिड आणि संताप आणणारा! एका हागऱ्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील तब्बल आठ गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झालाय..एका अज्ञात भामट्या हागऱ्याने संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील १४० गाव जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीत सकाळचा कार्यक्रम उरकला... या पाण्याच्या टाकीवरून आठ गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो..ही बाब निदर्शनास आल्यानंतर पाणीपुरवठा दोन दिवस बंद करण्यात आला आहे..सध्या पाण्याच्या टाकीच्या साफसफाई चे काम सुरू आहे..
संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथे "१४० गाव जीवन प्राधिकरण विभागा"ची पाण्याची टाकी आहे. या टाकीत काल सकाळी कुण्यातरी विकृत व्यक्तीने सकाळचा प्रातर्विधी उरकला..हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळब उडाली.. सरपंचांसह ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून साफसफाई चे आदेश दिले..या टाकीवरून होणारा पाणीपुरवठा तात्काळ थांबवण्यात आला आहे. अज्ञात भामट्याने पिण्याच्या पाण्याच्या टाकीत घाण का केली? हा हागरा कोण आहे? याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी समोर येत आहे.