शेतकरी धोंडोजी इंगळे पुराच्या पाण्यात वाहून गेले!;शोध कार्य सुर,खामगाव तालुक्यातील घारोड येथील घटना..
May 28, 2025, 13:30 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):धोंडोजी भगवान इंगळे हे पुतण्या राहुल मधुकर इंगळे याच्या सोबत दुचसकीवरून शेतातून घरी जात असताना पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे.
गेल्या काही दिवसापासून जिल्हाभरात पावसाची धुवाधार बॅटिंग चालू आहे.या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यातच २७ मे रोजी रात्री जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले आहेत. याच दरम्यान रात्री आठ वाजता च्या दरम्यान खामगाव तालुक्यातील शेतकरी धोंडोजी भगवान इंगळे (७०) रा.घारोड हे आपला पुतण्या राहुल मधुकर इंगळे यांच्यासोबत शेतातून दुचाकीवर घरी जात होते, यावेळी अकोली घारोड रस्त्यामधील नाल्याच्या पुलावरून दुचाकीवरून जात असताना नाल्याला मोठा पूर आला होता. दुचाकीसह दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले. पुतण्या राहुल इंगळे याला पोहता येत असल्याने राहुल वाचला मात्र धोंडोजी इंगळे दुचाकी सह वाहून गेले आहेत. या घटनेची माहिती हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास चौधरी यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.धोंडोजी इंगळे यांचा अद्यापही शोध लागला नाही. सध्या शोध कार्य चालू आहे. या घटनेची माहिती मंत्री आकाश फुंडकर यांना मिळताच त्यांनी संबंधित विभागाची संपर्क साधून इंगळे यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.