Fact check : खामगाव तालुक्‍यात खरंच कपाशीला काकडी लगडली?; काय आहे सत्‍य?

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कपाशीच्या झाडाला काकडी लागल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. शेतकऱ्याने पेरले काय अन् झाडाला लगडले काय असे कॅप्शन देऊन खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील ही घटना असल्याचे सांगण्यात आले. सगळीकडे चर्चा सुरू झाली. भालेगाव बाजारच्या नागरिकांना त्यांचे नातेवाइक, मित्रमंडळी फोन करून चौकशी करू लागले. पोस्ट खोटी असल्याचे सांगता सांगता त्यांच्याही …
 
Fact check : खामगाव तालुक्‍यात खरंच कपाशीला काकडी लगडली?; काय आहे सत्‍य?

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कपाशीच्या झाडाला काकडी लागल्याची पोस्‍ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. शेतकऱ्याने पेरले काय अन्‌ झाडाला लगडले काय असे कॅप्शन देऊन खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील ही घटना असल्याचे सांगण्यात आले. सगळीकडे चर्चा सुरू झाली. भालेगाव बाजारच्या नागरिकांना त्यांचे नातेवाइक, मित्रमंडळी फोन करून चौकशी करू लागले. पोस्ट खोटी असल्याचे सांगता सांगता त्यांच्याही नाकीनऊ आले.

सोशल मीडियावर कधी, कोण, काय व्हायरल करेल याचा नेम नाही. आलेली पोस्ट खात्री न करता जशीच्या तशी समोर पाठवली जाते. त्यामुळे अनेकदा खोट्या पोस्‍ट व्हायरल होतात. दोन- तीन दिवसांपासून भालेगाव बाजार येथे कपाशीला काकडी लागल्याचे वृत्त तसेच फेक निघाले. भालेगाव बाजार परिसरातील कोणत्याही कपाशीच्या झाडाला काकडी लगडली नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.