पोलीस सांगून - सांगून कंटाळले तरीही लोक एकेनात;सोन्याच्या गिन्न्यापाई बिहार'च्या मंटूकुमार'ची तीन लाखाने फसवणूक! खामगाव तालुक्यातील घटना..!
मंटूकुमार श्रीबीपीन मंडल (२८, रा. अफजपुर ता, जि, भागलपूर बिहार) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खामगाव तालुक्यातील अंत्रज फटावरील राजेश उर्फ अजय ज्ञानेश्वर शीतल भोसले, संदीप बुढा यासह इतर ५ ते सहा लोकांनी मंटूकुमार श्रीबीपीन याला १०० ग्राम सोन्याच्या गिन्न्या ३ लाख रुपयांत देतो. असे अमिष दाखवून २३ आक्टोबर'च्या सकाळी ११ वाजताच्या दरम्यान खामगाव - बुलडाणा रोडवरील वाघाळी फाट्यावर बोलावले होते. मात्र त्यांना सोन्याच्या गिन्न्या न देता चापटा बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली.
त्याच्याकडून तीन लाख रुपये व दोन मोबाईल किंमत अंदाजे (दहा हजार रुपये) असा ऐकून तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. याप्रकरणी मंटूकुमार मंडल यांनी तशी तक्रार खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केला आहेत. पुढील तपास पीएसआय राची पुसाम हे करीत आहेत.