खामगावात अतिक्रम भुईसपाट!; मोठ्या पोलीस बंदोबस्तात अनेक दुकाने जमीनदोस्त,अतिक्रमावरील कारवाईमुळे खामगावकर घेणार मोकळा श्वास.!
Jun 27, 2025, 16:40 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगावात आज सकाळपासूनच अनिधिकृत दुकाने, आस्थापने लावणाऱ्या दुकानदारांना नगरपालिकेने चांगला दणका दिलेला आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात अनेक दुकाने आस्थापने भुईसपाट करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.
खामगाव शहरात बऱ्याचशा ठिकाणी दुकानदारांनी अतिक्रम करून ठिकठिकाणी आपले छोटे मोठे व्यवसाय उभे केले होते. त्यामुळे ट्राफिकची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती, जणू काही खामगावचा श्वास गुदमरल्यासारखं होत होतं. त्यामुळे नगरपालिकेने याची दखल घेत आज सकाळपासूनच मोठ्या पोलीस बंदोबस्तात अनिधिकृत दुकाने,आस्थापने भुईसपाठ करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू केले आहे. यामध्ये जेसीबी मशीन, मोठा पोलीस बंदोबस्त, टेम्पो यासारख्या वाहनांचा समावेश आहे. या कारवाईमुळे खामगावकर आता मोकळा श्वास घेणार आहेत.