क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीतील जखमीचा मृत्यू; तिघांविरुद्ध महिनाभरानंतर गुन्हा दाखल..!

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एकाचा ११ ऑगस्ट राेजी मृत्यू झाला हाेता. या प्रकरणी पाेलिसांनी अकस्मिक मृत्यूंची नाेंद करून तपास सुरू केला हाेता. अखेर मृतकाच्या मुलाने एक महिन्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरून शेगाव पेालिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
मागील महिन्यात
 फिर्यादी शंकर गुलाबराव खोंड ३९ रा. जवळा पळसखेड ता. शेगाव जि. बुलढाणा यांनी पोलिसात फिर्याद दिली की, आरोपी श्रीराम गुलाबराव खोंड, सुधाबाई गुलाबराव खोंड, गायत्री श्रीराम खोंड यांनी संगनमत करुन गुलाबराव खाेंड यांना शेगाव ते बाळापुर रोडवरील अंबर हॉटेलच्या पाठीमागे लाकडी काठीने मारहण केली हाेती.
या मारहाणीत जखमी झालेल्या गुलाबराव खाेंड यांना सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव येथे दाखल करण्यात आले हाेते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ शासकीय रुग्णालय अकोला येथे भरती करण्यात आले होते.
उपचारादरम्यान ११ ऑगस्ट रोजी रात्री ११ वा दरम्यान गुलाबराव खोंड यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी शंकर खाेंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी तिन्ही आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.