रामनगर येथील ग्रामपंचायत समोर सख्खे चुलत भाऊ बसले उपोषणाला;जो पर्यंत कारवाई होणार नाही तो पर्यंत 'झुकेगा नही म्हणतात "! नेमकं मॅटर काय..?

 
खामगांव
खामगांव (भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगावच्या रामनगर येथे दोघे सख्खे चुलत भाऊ गेल्या दोन दिवसांपासून गावातील ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसले आहेत. जो पर्यंत कारवाई होणार नाही तो पर्यंत मागे न हटण्याचा निर्णय या भावांनी घेतला आहे.
सुबोध त्रिकाळ, रोशन त्रिकाळ असे उपोषण कर्त्या तरुणाची नावे आहेत. खामगाव तालुक्यातील रामनगर येथील ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. असे या उपोषण कर्त्या तरुणांचे म्हणणे आहे.
ह्या आहेत उपोषण कर्त्या तरुणाच्या मागण्या!
  •  २०२१ पासून आज पर्यंत ग्रामपंचायत रामनगर'चे स्पेशल ऑडिट करण्यात यावे.
  •  २०२१ पासून आज पर्यंत ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्यात यावी.
  • सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन कामाच्या अंदाजवपत्रकानुसार तपासणी करण्यात यावी.
  •  वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधारणा योजने अंतर्गत झालेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. या रस्त्याची अंदाज पत्रकानुसार तपासणी करण्यात यावी.
  • वार्ड क्रमांक ५ मधील नाली बांधकाम अंदाज पत्रकानुसार तपासणी करण्यात यावी. अंगणवाडी साहित्य खरेदी केलेल्या वस्तूची बिलावर लिहिलेल्या किमती याची तपासणी करावी.
  •  ग्रामपंचायत रामनगर येथे नियमित ग्रामसभा घेण्यात येत नाही.
असे भ्रष्टाचाराचे आरोप उपोषणकर त्रिकाळ बंधूंनी ग्रामपंचायतवर लावले आहेत. यावर चौकशी करून लवकरात - लवकर कारवाई करावी तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय उपोषण कर्त्या त्रिकाळ बंधूनी घेतला आहे.