झेंड्यावरून वाद पेटला! दोन गटांत संघर्ष: तुफान दगडफेक; दोन्ही गटाचे ४० जण ताब्यात! खामगाव तालुक्यातील हिवरखेड गावात तणाव..

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील काही दिवसांपासून गावातील दोन भिन्न समाजांत असलेला वाद आज मंगळवारी, १५ एप्रिल रोजी उफाळून आला. यामुळे खामगाव तालुक्यातील हिवरखेड या सामाजिक दृष्ट्या संवेदनशील गावात आज मंगळवारी दोन्ही गट एकमेका समोर आले. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली, एकमेकांवर दगडफेक करण्यात आले. यामुळे अनेक जण जखमी झाले आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील मिळून चाळीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उप विभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह दंगा काबू पथक, हिवरखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी, जलद कृती दल असा मोठा फौंज फाटा तैनात करण्यात आला आहे. यामुळे हिवरखेड गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी गावात तणाव पूर्ण शांतता आहे.
खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे दोन गटात एक झेंडा लावल्यावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत तसेच दगडफेकीत झाले . दरम्यान दोन्ही गटात दोन दिवसांपासून धुसफूस सुरू होती, काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला देखील ही धुसपूस कायम असल्याचे दिसून आले . मात्र आज मंगळवारी ती धुसफूस, दोन गटातील जुना वाद उफाळून आला. आज दोन्ही गट एकमेकांना भिडले, कडाक्याचा वाद झाला. या वादाचे रूपांतरण हाणामारी व दगदफेकीत झाले या घटनेत अनेक जन जखमी झाले. गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर दंगकाबू पथक ही गावात दाखल झाले आहे . सध्या हिवरखेड गावात तणावलूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रण मध्ये असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी अटक सत्र सुरु केले असून दोन्ही गटातील ४० इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.