जलंब येथे रेतीमाफियांमुळे शेत रस्त्याची वाट लागली! महसूल विभागाचे दुर्लक्ष?

 
शेगाव (संतोष देठे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील जलंब गावा मध्ये अवैध रेती व्यवसायाला ऊत आला आहे. या रेती वाहतुकीमुळे रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रेतीची वाहतूक होत असल्यामुळे रस्ता पूर्ण चिखलमय झालेला आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासन तसेच महसूल विभागाचेही दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी आता कुणाकडे पाहावे असा मोठा प्रश्न निर्माण झाला...

  जलंब गावालगाच्या नाल्यामधून रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ट्रॅक्टर द्वारे रात्रीच्या वेळी रेतीची वाहतूक केली जाते. मात्र यामुळे रस्त्यात चिखल निर्माण झाला आहे. ट्रॅक्टर मुळे रस्त्यात खुप मोठे खड्डे पडलेले आहे. बैल गाडी देखील या रस्त्याने जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

 

याच गड्ड्यामुळे काही दिवसा पुर्वी पाण्यात गड्ड्याचा अदांज न आल्या मुळे शेतकऱ्याची बैल गाडी पलटली होती, जीवित हाणी होतानां टळली अशातच १०- १५ दिवसानंतर शेतातुन सोयाबीन घरी आणायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे या संदर्भात यापूर्वी देखील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते मात्र त्यावर आतापर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही.