संतापी मामा! वाद सोडवण्यास गेलेल्या भाचीच्याच डोक्यात घातला दगड ; शेगाची घटना...

 

 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – कुटुंबातील वाद सोडविण्यास गेलेल्या भाचीवर चिडलेल्या मामाने दगडाने हल्ला करून तिच्या डोक्यात मारल्याची धक्कादायक घटना शेगाव येथील पंचशील नगर भागात घडली. या हल्ल्यात भाची गंभीर जखमी झाली असून, पोलिसांनी आरोपी मामाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता सुरेंद्र गव्हांदे (वय ३८, रा. जलंब) यांच्या भावाने त्यांच्या घरी येऊन बहिणींना "तुम्ही माझ्या घरी का आल्या?" असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने स्वतःच्या वडिलांना देखील मारहाण केली. हे प्रकरण मध्यस्थीने मिटवण्याचा प्रयत्न कविता गव्हांदे यांची मुलगी शारदा सुरेंद्र गव्हांदे हिने केला असता, चिडलेल्या प्रकाश लक्ष्मण खंडेराव याने रागाच्या भरात रस्त्यावर पडलेला दगड उचलून तिच्या डोक्यात जोरात मारला.
हेही वाचा...
या हल्ल्यात शारदा गव्हांदे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून रक्तस्रावही झाला. याप्रकरणी कविता गव्हांदे यांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी प्रकाश खंडेराव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.