मोताळा तालुक्यात घोंगावतेय भगवे वादळ!" गणपती बाप्पा...राज्यावरील विघ्न दूर करा"! मशाल जागर यात्रेदरम्यान बुधवतांची गणरायाचरणी प्रार्थना! यात्रेचा आज चौथा दिवस.....

 

मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ५ सप्टेंबर पासून मोताळ्यातून शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या मशाल यात्रेचा आज,८ सप्टेंबरला चौथा दिवस आहे. या यात्रेला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे..गावागावात ज्या उत्साहात बुधवंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत होत आहे त्यावरून बुधवंत यांची लोकप्रियता कमालीची वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातून २ आमदार आणि १ खासदार शिंदेच्या शिवसेनेत गेल्यानंतरही जिल्हाप्रमुख या नात्याने बुधवंत यांनी शिवसेना जिवंत ठेवली, केवळ जिवंतच नव्हे तर मजबूत संघटनदेखील उभारले..त्याचाच परिणाम या मशाल जागर यात्रेच्या निमित्ताने दिसून येत आहे. काल, तिसऱ्या दिवशी देखील प्रत्येक गावांत मशाल यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जालिंधर बुधवंत यांनी गणरायाचे दर्शन घेत, राज्यावरील विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली.

Budhvat
Budhvat
पुन्हई, वडगाव खंडोपंत, धोनखेड, चावर्दा, पिंपरी गवळी, पोफळी, तरोडा यासह इतर गावांत काल मशाल जागर यात्रा पोहचली. यावेळी विविध गणेश मंडळांना भेटी देत बुधवंत यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.भगवान श्री.गणेशाचे दर्शन घेत पार्थना देखील केली.दरम्यान यावेळी आयोजित कॉर्नर बैठकीत जालिंधर बुधवंत म्हणाले की, राज्यावर भयाचे, दहशतीचे, शेतकरी आत्महत्यांचे , भ्रष्टाचाराचे विघ्न आहे. दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत हीच परिस्थिती आहे. गणपतीबाप्पा विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे देशावरील, राज्यावरील विघ्न दूर करा अशी प्रार्थना गणरायाचरणी केल्याचे बुधवंत म्हणाले.
आजचा दौरा असा...
मशाल जागर यात्रेच्या चौथ्या दिवशी ही यात्रा १६ गावांत जाणार आहे. गुगली, कोल्ही गोलार, पिंपळगाव देवी, ९.३० वाजता सिंदखेड, १० वाजता लपाली, १०.३० वाजता महाळूंगी, ११ वाजता वडगांव, ११.३० वाजता लिहा, १२ वाजता कोल्ही गवळी, ३ वाजता टाकळी घडेकर, ३.३० वाजता आव्हा, ४ वाजता उऱ्हा, ४.३० वाजता दहिगाव, ५ वाजता चिंचखेड खू, ५.३० वाजता माळेगांव, सायंकाळी ६ वाजता निपाणा असा यात्रेचा चौथा दिवस राहणार आहे.