मोताळा - मलकापुरात हाहाकार! नळगंगा धरण ओव्हर फ्लो, ११ दरवाजे उघडले; शेकडोंचे संसार पाण्यात, नदीकाठच्या घरात पाणी घुसले; २००६ ची पुनरावृत्ती....

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा मलकापूर तालुक्यात काल रात्रीपासून तुफान पाऊस झाला..या पावसाने अनेक वर्षानंतर नळगंगा धरण ओव्हरफ्लो झाले..पहाटेच्या सुमारास नळगंगा धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले..यामुळे नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू झाला..यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नदीकाठच्या गावांत हाहाकार उडाला आहे.. शेकडो घरांमध्ये पाणी घुसले आहे, मलकापूर शहरातील नदीकाठच्या घरांत देखील पाणी घुसले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे...
 शेलापुर, तळणी, दाताळा, निंबारा, वाकोडी,कुंड, तांदुळवाडी , दसरखेड, मलकापूर परिसराला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
नळगंगा धरणाची ११ दरवाजे काल रात्री उघडण्यात आले होते. त्यातील दोन आता बंद करण्यात आलेले आहेत.सध्या नऊ दरवाजे सुरू आहेत..
महत्त्वाचे म्हणजे नळगंगा धरणाचे पाणी शेलापुर मार्गे मलकापूर जवळ समोर पूर्णा नदीत जाते. आणि तिथून तापी मध्ये जाते. हे पाणी हातनुर धरणात जाते. हातनुर धरणाचे दरवाजे उघडल्या गेले नाही तर बॅकवॉटर वाढते आणि नळगंगाचे जाणारे पाणी घेत नाही परिणामी मलकापूर शहरालगतच्या काही भागांना याचा फटका बसतो. नळगंगा धरणाच्या विसर्गामध्ये असलेल्या काही गावांना देखील तडाखा बसतो, त्यामुळे बुलडाणा जिल्हा प्रशासनाने जळगाव जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्याची कार्यवाही करण्याची गरज आहे.२००६ मध्ये देखील अशीच पूर परिस्थिती उद्भवली होती, त्यावेळी हतनुर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते...