8 हजार भाविकांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी घेतले श्रींचे दर्शन!
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नववर्षाच्या पहिल्या दिवशी आठ हजार भाविक शेगावी श्रींच्या लीन झाले.कोरोनामुळे काटेकोर खबरदारी घेऊन संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्याची सोय संस्थानने केली आहे. ई-पास काढून दर्शन घ्यावे लागत असल्याने गर्दीवर मर्यादा असली तरी जास्तीत जास्त भाविकांनी आज दर्शन घेतल्याचे समोर आले. मंदिर परिसर भाविकांनी गजबजला होता. राज्यच नव्हे …
Jan 1, 2021, 21:32 IST
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नववर्षाच्या पहिल्या दिवशी आठ हजार भाविक शेगावी श्रींच्या लीन झाले.कोरोनामुळे काटेकोर खबरदारी घेऊन संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्याची सोय संस्थानने केली आहे. ई-पास काढून दर्शन घ्यावे लागत असल्याने गर्दीवर मर्यादा असली तरी जास्तीत जास्त भाविकांनी आज दर्शन घेतल्याचे समोर आले. मंदिर परिसर भाविकांनी गजबजला होता. राज्यच नव्हे तर परराज्यातूनही भाविक दर्शनासाठी आले होते. दिवसभरात आठ हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचे संस्थानच्या सूत्रांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.