11402 विद्यार्थ्यांसाठी शेगाव तालुक्यात वाजणार 95 शाळांची घंटा!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते) ः शेगाव तालुक्यात 144 शाळा असून जि.प.च्या 76, न.प. च्या 14 तर 54 खासगी शाळा आहेत. त्यातील 9 वी ते 12 च्या शाळा अगोदर सुरू झाल्या असून, 27 जानेवारीला 5 वी ते 8 वी च्या 95 शाळांची 11402 विद्यार्थ्यांसाठी घंटा वाजणार आहे. त्यातील जि.प.च्या 50, न.प. च्या 7 तर खासगी 38 शाळांचा …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते) ः शेगाव तालुक्यात 144 शाळा असून जि.प.च्या 76, न.प. च्या 14 तर 54 खासगी शाळा आहेत. त्यातील 9 वी ते 12 च्या शाळा अगोदर सुरू झाल्या असून, 27 जानेवारीला 5 वी ते 8 वी च्या 95 शाळांची 11402 विद्यार्थ्यांसाठी घंटा वाजणार आहे. त्यातील जि.प.च्या 50, न.प. च्या 7 तर खासगी 38 शाळांचा समावेश असणार आहे.
तालुक्यात 1037 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असून, सर्वांची ऑक्टोबर महिन्यात कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात 9 वी ते 12 वीचे 273 शिक्षक, 218 शिक्षकेत्तर कर्मचारी आणि 649 प्राथमिक शिक्षक होते. आता 3 महिन्यांनी पुन्हा 649 शिक्षकांना 22 जानेवारीला कोरोना चाचणी करून 11402 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. रोज विद्यार्थी व शिक्षकांचा ताप व ऑक्सिजन तपासून त्याच्या नोंदी ठेवाव्या लागणार आहेत. मुलांना हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायजर पाणी उपलब्ध करावे लागणार आहे. 2 विद्यार्थ्यांमध्ये 6 फूट अंतर ठेवणे, मुले शाळेत जेवणार नाहीत. वही, पेन, मास्क, पाणी बॉटल इतरांना देणार नाहीत. तोंडात, नाकात, डोळ्यांत बोट घालणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. कोविड बाबतच्या शासन निर्णयाचे तंतोतंत पालन करून शाळा 3 ते 4 तास भरेल. पालकाचे पाल्यास शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शाळेत गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयावर भर द्यावा लागणार आहे हे विशेष.